'काळसे' मधील विविध कार्यक्षेत्रात विशेष योगदान असलेली 'आदर्श' व्यक्तिमत्वे.
* श्रीम. एस. एस. परुळेकर - शिक्षणक्षेत्र.
_"विद्यार्थ्यांनी दिलेले प्रेम आणि आदर हाच माझ्या दृष्टीने मला मिळालेला अत्युच्च पुरस्कार आहे."- श्रीम. शालिनी शंकर परुळेकर (परुळेकर बाई).
संपूर्ण नाव : श्रीम. शालिनी शंकर परुळेकर
जन्म : १५ सप्टेंबर १९५१
शिक्षण : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधून एम. ए. (I I) उत्तीर्ण
शासकीय अध्यापक महाविद्यालय, रत्नागिरी मधून बी.एड. (|) उत्तीर्ण
कार्यारंभ : न्यू इंग्लिश स्कूल, आचरा मध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून नियुक्त. (१२.७.१९७१ ते ११.६.१९७२)
श्री शिवाजी विद्यामंदिर, काळसे मध्ये स.शिक्षिका म्हणून नियुक्त (१२.६.१९७२ ते ५.२.१९९०
श्री शिवाजी विद्यामंदिर, काळसे मध्ये मुख्याध्यापिका म्हणून पदोन्नती (५.२.१९९० ते ३०.११.१९९४)
पुरस्कार : काळसे- धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ - काळसे या संस्थेकडून आदर्श शिक्षिका हा पुरस्कार प्राप्त.
मनोगत :
'शिक्षण क्षेत्र' हे मी एक पवित्र क्षेत्र मानते. ज्ञानदान हा 'कर्मयोग', 'भक्तियोग' आणि 'ज्ञानयोग' यांचा त्रिवेणीसंगम आहे. शिक्षण क्षेत्रात आज दिसणार्या अपप्रवृत्ती या समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने निश्चितच विघातक आहेत. काळ बदलला, परिस्थिती बदलली तरी नीतीमूल्ये बदलत नाहीत, ती चिरंतन आहेत. असत्य हे सत्य होऊ शकत नाही. अप्रामाणिकपणा हा प्रामाणिकपणा ठरू शकत नाही. दुष्ट प्रवृत्तींना आपण सत्प्रवृत्ती मानू शकत नाही. कुटुंबसंस्था आणि शिक्षणसंस्था या मुलांना ज्ञान, नीतीमूल्ये आणि संस्कार शिकविणार्या संस्था आहेत. या संस्था निरोगी समाजाचा पाया आहे. काळसे गावच्या 'काळसे-धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ' संचलित श्री शिवाजी विद्यामंदिर ची परंपरा सुसंस्कृत विद्यार्थ्यांची आहे. हि शाळा काळसे गावची प्रतिष्ठा आहे. हि परंपरा आणि प्रतिष्ठा अव्याहत रहावी हीच इच्छा -

Make your Buisiness known to the World Never again opportunity to advertise on world wide web.
MAKE HURRY: Business Ads recieving from all over Sindhudurg District: Malvan, Kudal, Kankavali, Dodamarg, Sawantwadi, Vengurla on http://www.sindhudurgcassifieds.weeby.com has been started
Grab your space today: http://www.kalsecsc.weebly.com has started receiving Ads on District level.
For more details: Contact: Mr. Kishor Pendurkar on 9049110765 or email at: [email protected].